मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याची राज्यसरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करावी, ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहोतगी यांनी आज भक्कमपणे मांडली. आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी परमजीत सिंग हे राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितिचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

पण अनेक सामजिक आणि आर्थिक प्रश्न नव्यानं निर्माण होत आहे, त्यामुळे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा फेरविचार व्हावा, असा युक्तीवाद याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकील नरसिंह यांनी केला.