ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील संदेश फसवे; सायबर भामट्यांपासून सावध रहावे – महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई : ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नये व सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.


सध्या कोरोना महामारीच्या काळात असा फसवा व्हाट्सॲप मेसेज फिरत आहे की, एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले body pulse व रक्तातील oxygen चे प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या pulse-oxy meter हे उपकरण घ्यायची गरज नाही व त्याबरोबर सदर मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते.


महाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की,


१) कृपया अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.


२) वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाईल ॲप्स वरून oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात.


३) मुळात pulse – pulse -oxy meter या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या मोबाईल ॲपमधील सॉफ्टवेअर यामध्ये बराच फरक आहे. त्या प्रणाली मध्ये वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत जे या मोबाईल ॲपमध्ये नाहीत.


४) अशी मोबाइल ॲप ही सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयोग सायबर भामटे तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात.


५) शक्यतो अशी मोबाईल ॲप डाउनलोड करून वापरणे टाळा.


६) जर अशी कोणतेही मोबाईल ॲप तुम्ही वापरत असाल तर आपल्या मोबाईलच्या settings मध्ये जाऊन या ॲप्सना ठराविकच access allow करा. 


केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image