पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.


आषाढी एकादशी निमित्त व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पैठण येथील ‘संतपीठ’ सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला आमदार अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.


सध्या या संत विद्यापीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्गखोल्या, ग्रंथालय आणि १०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असलेले वसतिगृह आहे. संतपीठाची इमारत लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून संत वाङ्मयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले. 


संत वाङ्मयाचा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण दिले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या रुचिनुसार त्यामध्ये योग्य बदल करून संत वाङ्मयाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. तो तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणारआहे. या आठवड्यात पैठण येथील संतपीठाच्या जागेची पाहणी करून याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी संगितले.


यावेळी  संचालक डॉ. धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले सहभागी झाले होते. 


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image