पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन आहे. ‘चांगल्या भविष्याची निर्मिती’ ही यंदाच्या इंडिया आयडिया समिटची संकल्पना आहे.


या आभासी परिषदेमध्ये भारतीय आणि अमेरिकन सरकारचे धोरणकर्ते, राज्यस्तरीय अधिकारी आणि व्यवसाय आणि समाज क्षेत्रातील विचारवंत नेते यांची वैशिष्ट्यपूर्ण उपस्थिती असणार आहे. शिखर परिषदेच्या इतर प्रमुख वक्त्यांमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ, व्हर्जिनियाचे सिनेट सदस्य आणि सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष मार्क वॉर्नर, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा समावेश आहे. शिखर परिषदेत भारत-अमेरिका सहकार्यासह आणि जगभर पसरलेल्या महामारी पश्चात उभय देशांमधील भविष्यातील संबंध यासह इतर विषयांवर चर्चा होईल.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image