शेतकऱ्यांना पीककर्जाचा अर्ज घरबसल्या भरता येणार, ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीककर्जाचा अर्ज आता घरबसल्या भरता येणार असून, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या  शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचं जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी सांगितलं आहे.


ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात आयोजित साप्ताहिक बैठकीत बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणताना होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनानं ही सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.