नवी दिल्ली : कोचिन शिपयार्ड लिमिटेड (CSL)या कंपनीने, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
केंद्रीय नौवहन मंत्री (स्वतंत्र प्रभार)श्री. मनसुख मांडवीया यांनी अशा प्रकारचे जगातील पहिले पूर्णतः विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज बनविण्याचे कंत्राट, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम कंपनीकडून मिळविल्याबद्दल आणि त्या निमित्ताने नौवहन क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल ,अशी कामगिरी केल्याबद्दल सीएसएल कंपनीचे अभिनंदन केले. श्री. मांडवीया म्हणाले, की जगातील अनेक विश्वसनीय आणि ऐतिहासिक कंपन्यांशी स्पर्धा करत,हे कंत्राट सीएसएलने खेचून आणले आहे.
सीएसएल ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी जहाजे बनविणारी कंपनी आहे. नॉर्वेतील किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्वात मोठ्या नोर्जेस ग्रूपेन एएसए या कंपनीची , उपकंपनी असलेल्या, ॲस्को मेरीटाईम एएस या कंपनीची ही प्रतिष्ठित निर्यात आँर्डर सीएसएलने जिंकून आणली.
हा विजेवर चालणाऱ्या जहाज बांधणीचा प्रकल्प, हा नॉर्वेजिअन सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ओस्लोजवळील समुद्रधुनीतून जाणारा(Oslo fjord)नॉर्वेजिअन सरकार पुरस्कृत उत्सर्जन रहित वाहतुक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मेसर्स काँगसबर्ग(M/s Kongsberg) ही स्वयंचलित जहाजांसाठी तंत्रज्ञान पुरविणारी आणि मेसर्स विल्यमसेन(M/sWilhelmse), ही नौवहन क्षेत्रातील
सर्वात मोठी कंपनी,यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या मेसर्स मास्टरली(M/s Massterly AS) या पहिल्या तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ही जहाजे चालवली जातील. कार्यरत झाल्यावर जगातील व्यापारी जहाज क्षेत्रात, ही स्वयंचलित जहाजे शून्य कार्बन उत्सर्जनासहित एक नवा मापदंड तयार करतील.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.