रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने या प्रवासाच्या तिकीटासाठी ४०० डॉलर्स दिले होते. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.