राजभवनातल्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजभवनातल्या अठरा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे.

आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. माझा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आली आहे. आपल्या प्रकृती संदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केलं आहे.