शरद पवार यांच्या ताफ्यातल्या पोलीसांच्या एका गाडीला अपघात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातल्या पोलीसांच्या एका गाडीला आज सकाळी मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. शरद पवार हे आज पुण्याहून मुंबईला येत असताना, सकाळी १० वाजता लोणावळा इथल्या अमृतांजन पूलाजवळ गाडीला अपघात झाला.

या अपघातात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. जखमी पोलीसाला लोणावळ्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

अपघातग्रस्त गाडी शरद पवार यांची गाडीच्या मागे होती. पवार यांच्या गाडीचं कोणतंही नुकसान झालेलं नसून, पवार सुखरुप मुंबईला पोचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image