नीट पुढे ढकलल्याची अफवा खोटी - केंद्र सरकार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरची पात्रता आणि प्रवेश परिक्षा अर्थात नीट पुढे ढकलल्याची अफवा खोटी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारची सूचना समाजमाध्यमांवर फिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. परंतु ही परिक्षा पूर्वी घोषित केल्याप्रमाणे २६ जुलै रोजीच घेण्यात येईल असं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेत स्थळांवरच्या सूचनाचं पालन करावं असंही सरकारनं म्हटलं आहे.