'ट्रेल' आता मराठीतही उपलब्ध


विविध विषयांवरील व्हिडीओ आता मराठीतही बनविणे होणार शक्य 


मुंबई : भारतातील वेगाने विस्तारणारा लाईफस्टाइल व कॉमर्स मंच 'ट्रेल'ने मराठीसह बंगाली आणि कन्नड या तीन नव्या प्रादेशिक भाषांना समाविष्ट केले आहे. आरोग्य आणि फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, प्रवास, चित्रपट समीक्षण, पाककृती आणि गृहसजावट यासारख्या विविध श्रेणीतील अनुभव, सूचना आणि समीक्षण शेअर करण्यासाठी यूझर्ससाठी ट्रेल हा सहज उपलब्ध होणारा मंच आहे. अॅपवरील व्हिलॉगिंगवर यूझर्सना त्यांच्या स्थानिक भाषेत ५ मिनिटांचा व्हिडिओ तयार करता येतो. तसेच अॅपवरील ‘शॉप’ फीचरद्वारे व्हिलॉग्समध्ये सादर केलेले उत्पादन खरेदी करण्यासाठी मदत केली जाते. यासह, अॅपद्वारे यूझर्सना बक्षीस आणि निर्मितीचा आनंद कमावण्याचीही संधी मिळते.


‘व्हिडिओ पिनटरेस्ट ऑफ इंडिया’ या नावाने लोकप्रिय असलेल्या ट्रेलने यापूर्वी तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये सामग्री उपलब्ध केली होती. भारतीय लोकांना अर्थपूर्ण सामग्री  पुरवण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित करत ट्रेलने सामग्री निर्माते आणि ग्राहकांना त्यांच्या भाषिक पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. समविचारी व्यक्ती, जे स्वत:चा हक्क वापरून ‘की ओपिनिअन लीडर्स’ म्हणून उदयास येऊ शकतात, अशांना एकत्र आणून त्यांचा समुदाय बनवण्याचा मंचाचा उद्देश आहे. १.९ कोटी डाउनलोड्ससह अॅपवर दर महिन्याला ९० लाखांहून अधिक अॅक्टिव्ह सदस्य असून वर्षभरात ट्रेलने २० पटींनी अधिक वृद्धी अनुभवली आहे.


ट्रेलचे सहसंस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, 'देशाच्या शहरी भागातील २०५ दशलक्ष इंटरनेट यूझर्सच्या तुलनेत ग्रामीण भागातील यूझर्सची संख्या २२७ दशलक्षांच्या घरात पोहोचली आहे. परिणामी प्रादेशिक भाषांमधील अर्थपूर्ण आणि प्रासंगिक सामग्रीची मागणी वाढत आहे. आता तीन नव्या भाषा समाविष्ट केल्याने तसेच त्यांच्या स्थानिक भाषेत सामग्री उपलब्ध केल्याने अधिक यूझर्स आकर्षित होतील असा आम्हाला विश्वास आहे.'


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image