जगभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार काल जगभरात कोविड१९ रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. गेल्या २४ तासात जगभरात १ लाख ८९ हजार नवे रुग्ण आढळले. ब्राझिलमधे ४६ हजार ८०० पेक्षा जास्त तर अमेरिकेत ४४ हजार ४०० नवे रुग्ण एका दिवसात आढळले.