राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल कोल्हापूरमध्ये ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून संसर्ग नियंत्रणात येताच ही प्रक्रिया राबवली जाईल असं देशमुख यांनी सांगितलं.