राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती बाद ठरल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार आहेत. 

Popular posts
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image