सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचं म्हटलं होतं. हे पत्र खोटं असून मंडळानं असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं, मंडळाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.