इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इनसॅट-३डीएस  वाहून नेणाऱ्या  जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV चं हे सातवं प्रक्षेपण असेल आणि ते  इनसॅट-३डीएस या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थिर करेल. हा उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं विकसित करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणि आपत्तीची आगाऊ सूचना देण्यासाठी हा उपग्रह भूभाग आणि महासागरांच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करेल.