आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या  अंतराळसंस्था  नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चार अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन मोहिमेला सप्टेंबर २०२६ पर्यंत साधारण एक वर्ष उशीर होणार आहे. तर आर्टेमिस दोनही चंद्राभोवती अंतराळवीर पाठवण्यासाठी आणि जीवन समर्थन प्रणालीची चाचणीघेणारी १० दिवसांची मोहीम तसंच सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढं ढकलली जाणार आहे.दरम्यान मोहिमांच्या या विलंबामुळे या कार्यक्रमाशी संबंधित विकासात्मक आव्हानांवर काम करण्यास पुरेसा  वेळ उपलब्ध झाला असल्याचं नासानं  सांगितलं.