एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं  यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. खगोलीय स्त्रोतांपासून वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्याचा, भारताचा हा पहिलाच  प्रयत्न आहे.एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे,आकाशगंगेतली कृष्ण विवरं आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे.

एक्सपोसॅट उपग्रहाबरोबर प्रक्षेपित करण्यात आलेल्या दहा वैज्ञानिक उपग्रहांमध्ये इस्रोच्या तीन उपग्रहांसह  इतर संस्थांच्या उपग्रहांचा समावेश आहे.हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.एक्सपोसॅट अभ्यास उपग्रहाचा  कालावधी पाच वर्षांचा असून,तो  कक्षेत यशस्वीपणे स्थिरावल्याचं इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी सांगितलं.एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अंतराळ राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं २०२४ या वर्षाची लक्षवेधी सुरुवात केल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image