भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्देश्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं उद्देश्य केंद्र सरकारनं आखलं असल्याची माहिती G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी  दिली. ते आज नवी दिल्ली इथं ७ व्या FICCI परिपत्रक अर्थशास्त्र परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते.भारताला कमी खर्चात हरीत हायड्रोजनचा उत्पादक बनण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे,असंही ते म्हणाले,आज हरीत हायड्रोजनची किंमत साडेचार डॉलर प्रति किलोग्रॅम आहे.२०३० पर्यंत तो एक डॉलर प्रति किलोग्रॅमवर ​​आणण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे.इलेक्ट्रिक वाहनांवर भर देताना कांत यांनी दावा केला की पुढील ४ ते ५ वर्षांत संपूर्ण देश इलेक्ट्रिक वाहनाकडे वळेल.