ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.सुधारित योजने अंतर्गत,आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून,एकूण पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी  हे प्रोत्साहन लागू राहील,असं अवजड उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.मंजुरी मिळालेला अर्जदार सलग पाच आर्थिक वर्ष लाभांसाठी पात्र असेल,मात्र ३१मार्च २०२८ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षा नंतर पात्र ठरणार नाही,असं यात म्हटलं आहे.ऑटोमोबाईल क्षेत्राला सुस्पष्टता आणि साहाय्य प्रदान करून विकास आणि स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी या सुधारणा उपयोगी ठरतील असं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image