दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय खुला ठेवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला.रेशीम उद्योगाच्या विकासासाठी "सिल्क समग्र २" योजना राबवण्याचा तसंच विदर्भातला सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणं,मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता हे निर्णयही आजच्या बैठकीत झाले.अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर या बैठकीत निश्चित करण्यात आला.त्यानुसार कारसाठी २५० रुपये पथकर द्यावा लागणार आहे.