शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी - अंबादास दानवे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.या कार्यक्रमाची सत्यता राज्यातल्या जनतेसमोर आणण्यासाठी आपण राज्यव्यापी "जनता दरबार" हा उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी काल पत्रकाद्वारे जाहीर केलं.येत्या १० तारखेपासून मुंबईतून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.