मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करताना बोलत होते.गेल्या दीड वर्षापासून मराठवाड्यातल्या अनेक प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. सांगली कोल्हापूर मध्ये पुराचं वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी केंद्रानं आणि जागतिक बँकेनं मान्यता दिली आहे,असं त्यांनी सांगितलं.राज्याला नैसर्गिक शेतीकडे वळवायचं आहे.२५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती मोहिमेत आणत आहोत.शेतीला सौर ऊर्जेवर वीज देण्याचा प्रयत्न आहे,त्यामुळे विजेची समस्या दूर होईल,असाही फडनवीस म्हणाले.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड,मंत्री अतुल सावे,पालकमंत्री संदीपान भुमरे,गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यावेळी उपस्थित होते.