आर्थिक विकासात भारतानं नवनवे विक्रम प्रस्थापित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून गेल्या दहा वर्षांत विमान तळांची संख्या ७४ हून दीडशे अर्थात दुप्पट झाली आहे.देशातल्या प्रमुख बंदरांची मालवाहतूक क्षमता देखील दुप्पट झाली आहे,असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.प्रधानमंत्र्यांनी आज तिरुचिरापल्ली इथं विमानवाहतूक,रस्ते,रेल्वे,जहाज बांधणी ,उच्च शिक्षण,तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित २० हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली.तिरुचिरापल्ली इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते आज झालं.