भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे,  असं  बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.  राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना आज त्यांनी ही माहिती दिली. क्रूझ  प्रवाशांची आठ लाख ७२ हजारांवर पोहोचली आहे,  असं  ते यावेळी म्हणाले.  क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकात्मिक दृष्टीकोनातून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.