अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवाला जानेवारीपासून प्रारंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा शतक महोत्सव जानेवारी ते मे २०२४ दरम्यान राज्य शासनातर्फे साजरा करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली. हा स्पर्धात्मक महोत्सव मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर जिल्ह्यासह राज्यातल्या २२ केंद्रांवर होणार आहे. यात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. सर्वोत्कृष्ट स्पर्धकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image