देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं आवाहन केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं आहे. गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक उद्दिष्टं साध्य करून जागतिक स्तरावर भारताने स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे असं त्यांनी ध्वनीचित्रफित संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून प्रत्येक भारतीयाने यामध्ये  सहभागी व्हायला हवं असं ते म्हणाले.