देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दीष्ट्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं युवा पिढीला आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘ विकसित भारत @२०४७- युवकांचा आवाज’ या कार्यशाळेचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले की, देश २५ वर्षाच्या अमृत काळाच्या कालखंडातून जात असून देशातील युवकांनी एक तरी संकल्प करायला हवा. ते पुढे म्हणाले की  असा संकल्प करा जो विकसित भारताचं उद्दीष्ट्ट साध्य करेल. त्यांनी युवकांचं लक्ष्य आणि संकल्पाचे ध्येय एक असायला हव यावर भर दिला. आजचा दिवस संकल्पांसाठी महत्वपूर्ण असून, १० उत्कृष्ट  संकल्पांना  चांगले  पुरस्कार देण्यात येतील असही त्यांनी सांगितलं    

प्रधानमंत्री म्हणाले की, शिक्षण संस्थांची भूमिका ही कौशल्यक्षम व्यक्तीची निर्मिती अशी असायला हवी. इतिहास बघितल्यास विविध संस्थांनी देशातील युवा शक्तीला सशक्त बनविल्याच दिसून येत.व्यक्ती निर्माण झाल्यास सुदृढ राष्ट्राची निर्मिती होत असते आणि सध्या भारताच्या युवा शक्तीवर संपूर्ण जगाचं लक्ष असल्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मोदी यांनी देशभरातील राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलगुरू, संस्था प्रमुख आणि प्राध्यापक सदस्यांना संबोधित केल.