विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

 

अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ परिसरात आयोजित आढावा बैठकीत करण्यात येत असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन याबाबत केलेल्या पूर्वतायरीची माहिती त्यांनी घेतली.

दरवर्षी अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करावी. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे. वाहतुकीचे नियोजन करून त्याची नागरिकांना माहिती द्यावी , अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image