संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सुधारणा झाल्या नाहीत तर संयुक्त राष्ट्रांची परिणामकारकता हळूहळू नाहीशी होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर भारत हा मुद्दा वारंवार उपस्थित करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भारत चीन संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की चीन सीमाभागाशी संबंधित कराराचं पालन करत नसल्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव आहे. भारत सध्या प्रगतीच्या मार्गावर असून २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याची भारताची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.