‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये भारतानं हे जहाज मालदीव नौदल संरक्षण दलाला भेट म्हणून दिलं होतं. यंदाच्या मे महिन्यात हे जहाज परतलं होतं.  विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीमध्ये नूतनीकरण झाल्यावर आता ते भारतीय नौदलात नव्या रूपात दाखल झालं आहे.

या युद्धनौकेवर प्रगत एमटीयू इंजिन, वॉटर जेट प्रोपल्शन, अत्याधुनिक दळणवळण उपकरणं, तोफा आणि प्रगत रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात देखरेख आणि संरक्षणासाठी ते तैनात केलं जाईल. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image