कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, संभाजी नगर आणि पुणे इथं कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजार भाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसंच शिर्डी इथं लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिले, अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली.