भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल - मंत्री हरदीप सिंह पुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. गगनयान मोहिमेमुळे मानवाच्या अंतराळ क्षेत्रातल्या क्षमता सिद्ध झाल्या असून, भारताच्या अंतराळ क्षेत्रानं गेल्या ९ वर्षांत प्रगतीची मोठी झेप घेतली आहे, असं ते यावेळी म्हणाले. 

जागतिक अंतराळ क्षेत्रातला आपला वाटा दोन टक्क्यावरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून,  येत्या दशकभरात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सध्याच्या ८ अब्ज डॉलर्स वरून १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले. नवोन्मेषाचं महत्व अधोरेखित करत, अंतराळ क्षेत्रात आज तरुणांच्या नेतृत्वाखाली १९५ पेक्षा जास्त  स्टार्टअप्स कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.