अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची  चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं कला प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.वन दलातल्या वनरक्षकांचे हक्क आणि समाजातला त्यांचा सन्मान यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही याची काळजी घेणं, तसंच स्वदेशी ज्ञानाचं  जतन,संवर्धन आणि वापर करण्याची गरज असल्याचही त्यांनी सांगितलं.जगातल्या एकूण वाघापैकी ७० टक्के वाघ भारतात आढळत असून, या यशात व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांच्या आसपास राहणाऱ्या समुदायांचही महत्त्वाचं  योगदान आहे, असं त्या म्हणाल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image