पहिल्या टप्प्यात १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी दिली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

विमा कंपन्यांनी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं मुंडे यांनी सांगितलं. २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याच्या आदेशावर बहुतांश विमा कंपन्यानी विभागीय आणि राज्य स्तरावर अपील केलं होतं. अपिलांच्या सुनावण्यानंतर विमा कंपन्यानी आतापर्यंत, एकूण १ हजार ७०० कोटी रुपये रक्कम द्यायचं मान्य केलं आहे. जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या आणि विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे, असं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे  १५५ कोटी ७४ लाख इतकी रक्कम वितरित केली जाणार असून, ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image