नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
नागरीकांनी वस्तू किंवा त्याच्या निर्मात्यासोबत सेल्फी काढून नमो ॲपवर पोस्ट करु शकतील त्यासाठी एक लिंक देखील पंतप्रधानांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्टवर म्हटले आहे :
"नमो ॲपवरील थ्रेड्ससाठी व्होकल फाॅर लोकल होऊन भारताची उद्योगशीलता आणि सर्जनशीलता याचा गौरव करत ही दिवाळी साजरी करू या!
ही दिवाळी, नमो अॅपवर #VocalForLocal थ्रेड्ससह भारताची उद्यमशीलता आणि सर्जनशीलतेच्या भावनेने साजरी करूया.https://t.co/1v0F1QtPAy
स्थानिक स्तरावर तयार केलेली उत्पादने खरेदी करा आणि नंतर नमो अॅपवर उत्पादन किंवा उत्पादन निर्मात्यासोबत सेल्फी पोस्ट करा.
(1/2) https://t.co/NtEGlA1lra