मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी काल पिपल्स जस्टीस पार्टीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. भारतीयांबरोबरचं चीनी नागरिकांनाही मलेशियात व्हिजाशिवाय येता येणार आहे.