२६/११ मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १५ वर्षं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांसोबत राज्य सरकार सदैव सोबत आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय लष्करानंही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण केली.