कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर सेवेला सर्बानंद सोनोवाल दाखवणार हिरवा झेंडा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आज मुंबईत, कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर, अर्थात पर्यटन जहाजाच्या देशांतर्गत सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. जागतिक क्रूझ पर्यटनाच्या क्षेत्रात भारताचं स्थान निर्माण करण्याचा मंत्रालयाचा हा प्रयत्न आहे.