भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष मंत्रालयाला सुवर्णपदक

 

नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील ‘मंत्रालये आणि विभाग’ श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थे’ द्वारे आयुष मंत्रालयाला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आयुष उपचार पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने या मेळ्यात विविध उपक्रमांसह आयुष दालन उभारले होते. आयुष मंत्रालयाने राबवलेले विविध उपक्रम आणि वैज्ञानिक पुराव्यावर आधारित दृष्टिकोन ठेवून केले गेलेले नाविन्यपूर्ण सादरीकरण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.

आयुष- नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी, आयुष मंत्रालयाने या दालनात एकूण 18 आयुष स्टार्ट-अपना नवीन उत्पादनांसह प्रदर्शनाची संधी दिली होती. आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी, योग-निसर्गोपचार, सोवा-रिग्पा यांसारख्या आयुष वैद्यकीय पद्धतीने मोफत उपचार केंद्रांची सोय देखील या दालनात उपलब्ध करून देण्यात आली होती.

2014 मध्ये स्थापना झाल्यापासून, आयुष मंत्रालय आपल्या उद्दिष्टासोबत सातत्याने प्रगती करत आहे असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोनवाल यांनी या सन्मानानिमित्त आयुष मंत्रालयाचे विशेष अभिनंदन करताना सांगितले. मंत्रालय नवीन असूनही, त्याला उत्कृष्ट कार्यासाठी सुवर्णपदक मिळणे हे सिद्ध करते की, आयुष मंत्रालय आणि त्याचा चमू पुराव्यावर आधारित उपलब्धी आणि आयुषच्या विविध औषध उपचार पद्धतीच्या नवकल्पना मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी होत आहेत. पारंपारिक औषध प्रणाली भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त वापरली जाणारी वैद्यकीय प्रणाली म्हणून उदयास येत आहे. आयुष मंत्रालयाच्या सततच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात भारताला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवून देण्यात यश आले आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image