पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपससिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ऊर्जा रूपांतर संवाद सत्रात ते बोलत होते. दीड वर्षात इतर देशांमध्ये पेट्रोलचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असताना भारतात पेट्रोलचे दर ५ टक्क्यांनी, तर डिझेलचे दर शून्य पूर्णांक २ दशांश टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार कमी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.