भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचं भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सांगितलं. संस्थेच्या ७१ व्या वर्धापन दिनाप्रसंगी ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. ईपीएफओचं उद्दिष्ट योजनांचा सार्वत्रिक प्रसार वाढवण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्याच्या भागधारकांना सेवा प्रदान करणं आहे. ईपीएफओने दिलेल्या ८ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज दरानं सुमारे २४ कोटी खाती अद्ययावत करण्यात आली असून, ईपीएफओकडे आलेला कोणताही दावा आता २० दिवसांत निकाली काढला जात असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितलं.सध्या ईपीएफओ सध्या ७ लाख ६० हजार लाख आस्थापनांना सेवा पुरवते. या आस्थापनांचे त्याचे ७ कोटी १० लाख सदस्य आणि ७२ लाख २३ हजार पेन्शनधारक आहेत. या कार्यक्रमात कामगार आणि रोजगार मंत्रालयातील राज्यमंत्री रामेश्वर तेली देखील उपस्थित होते. नवी दिल्लीतल्या ईस्ट किडवाई नगर इथल्या ईपीएफओच्या मुख्य कार्यालयाचं आणि तुमकुरु कर्नाटकातल्या प्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचं त्यांनी उद्घाटन केलं.