देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं की गुरु नानकांनी समानता आणि नि:स्वार्थ मूल्ये रुजवली. गुरुनानकांचा उपदेश मानवतेला एकता, समानता, सहिष्णुता आणि नि:स्वार्थ सेवाभाव रुजवण्यास चालना देतो, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं की दुसऱ्यांची सेवा करण्याचा आणि बंधुभाव वाढवण्याचा श्री गुरु नानक देव यांचा संदेश जगातल्या लाखो लोकांना प्रेरित करतो. श्रीलंकेतल्या भारतीय दूतावासातल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातही गुरु नानक जयंतीनिमित्त किर्तनाचे आयोजन केलं होतं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image