“कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ म्हणजे जल पर्यटन आणि पर्यटनातल्या एका नवीन युगाची पहाट दर्शवतो - मंत्री सर्बानंद सोनोवाल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): “कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग असून जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो. हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “देखो अपना देश” या उपक्रमाशी सुसंगत आहे.” असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितल.
सर्बानंद सोनोवाल यांनी काल मुंबईतून भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज ‘कोस्टा सेरेना’ क्रूझला हिरवा झेंडा दाखवून क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा आरंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.
भारतातल्या क्रूझ पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा शुभारंभ शक्य झाला आहे. कोस्टा क्रूझ, इटली कार्निव्हल कॉर्पोरेशनचा एक भाग आहे, जो नामांकित क्रूझ ब्रँड्ससह जगातील सर्वात मोठ्या क्रूझिंग समूहांपैकी एक आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.