कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात  हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर आज ते बोलत होते.  या प्रकल्पामुळे अंदाजे साडेतीन हजार रोजगाराची निर्मिती होणार असून, त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावं, अशी शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले.


परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून, यापुढेही गुंतवणूकदारांसाठी राज्यात अनुकूल वातावरण राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  रत्नागिरी शहरातलं नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचं कामकाज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज  झालं . तसंच  'नमो ११ सूत्री' कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी उपक्रमाचंही उद्घाटन त्यांनी केलं.