पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३ पदकं मिळवली आहेत. पुरुषांच्या F64 भालाफेक स्पर्धेत आज सुमित अंतिलनं सुवर्णपदक पटकावलं, तर पुष्पेंद्र सिंगनं कांस्यपदक मिळवलं. F37/38 भालाफेक प्रकारात हॅनीने सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या रिकर्व तिरंदाजी स्पर्धेत हरविंदर सिंग आणि साहिल या जोडीने रौप्यपदकाची कमाई केली. याखेरीज क्लास फोर टेबल टेनिस, बॅडमिंटन मिश्र दुहेरी, महिलांची थाळीफेक स्पर्धा तसंच पुरुषांच्या T35 200 मीटर आणि T37 200 मीटर धावण्याच्या शर्यतीतही भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकं मिळवली. या स्पर्धेत विविध १७ क्रिडा प्रकारांमध्ये  भारताचे ३०३ खेळाडू सहभागी झाले आहेत.