अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने घेतला वेग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने वेग घेतला आहे. मॅकार्थी यांचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्टिव्ह स्कॅलिस आणि बायडेन सरकारविरोधक जिम जॉर्डन यांनी या पदासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं. रिपब्लिकन पक्षात स्कॅलिस हे मॅकार्थींहून अधिक प्रतिगामी म्हणून ओळखले जातात. तर पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते असलेले जॉर्डन हे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. मॅकार्थी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाशी समझोता करण्याबाबत त्यांचे सहकारी नाराज होते. मॅकार्थी यांच्या हकालपट्टीमुळे अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा देण्याचा निर्णय अडचणीत आला आहे.