जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सामाजिक आणि आर्थिक माहितीवर आधारित जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ही माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल पाटण्यात भरलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. नऊ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

सतरा विविध मुद्द्यांच्या आधारे ही पाहणी करण्यात आली ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. जाती आधारित पाहणीचा अहवाल बिहार शासनानं परवा जाहीर केला. बिहारमधल्या लोकसंख्येतील विविध जातींची हिस्सेदारी यात नमूद करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावर शासनाला सर्व नागरिकांना न्याय देता येईल असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे परंतु राज्यातला मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने यावर टीका केली असून राजकीय फायद्यासाठी हा अहवाल नितीश कुमार यानं  आणल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.