बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यासाठी समाजमाध्यमांना नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक्स, युट्युब आणि टेलीग्राम या समाजमाध्यमांनी बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन त्वरीत काढून टाकण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या यंत्रणांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारचा मजकूर त्वरीत आणि कायमस्वरुपी काढून टाकावा आणि अशी पोस्ट करणाऱ्यांना या प्लॅटफॉर्मवर प्रवेश देणं त्वरीत बंद करावं असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.  भविष्यात बाल लैंगिक अत्याचाराचा प्रसार रोखण्यासाठी मसुदा प्रसारित करण्यासंदर्भातील अल्गोरिदम आणि कुणी अशा प्रकारची पोस्ट केल्यास त्याची त्वरीत दखल घेण्यासंदर्भातील यंत्रणा सक्रिय कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करावं अशा सूचना या समाजमाध्यमातील कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.