प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर / ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. जोधपूर आयआयटी चा नवीन परिसर आणि अनेक महामार्ग यांचा त्यात समावेश आहे. राजस्थानातल्या दोन नवीन रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

राजस्थानच्या जनतेसाठी केंद्रसरकार अनेक योजना राबवत असून काँग्रेस सरकारने आजवर फक्त भ्रष्टाचारच जनतेच्या झोळीत टाकला अशी टीका मोदी यांनी जाहीर सभेत केली.